Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

चांद शिरदवाड ढोल वादन स्पर्धेत हेरवाडचा संघ विजयी

  गुर्लापूरचा संघ उपविजेता; कर्नाटक – महाराष्ट्रातील २२ संघाचा सहभाग निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड येथील आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेव मंदिरात चांदपीर वालुग मंडळातर्फे आंतरराज्य ढोलवादन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये हेरवाडचा संतुबाई वालुग मंडळ विजेता ठरला. धनगर समाजाचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल बन्ने यांच्या अध्यक्षतेखाली तर मनोज मगदूम, अजित …

Read More »

अडकूर येथे गोवा बनावट मद्याचा साडेपाच लाखाचा साठा जप्त

  राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाची कारवाई चंदगड (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाला अवैद्य गोवा बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने चंदगड येथील अडकूर -इब्राहिमपुर रस्त्यावर वाहनाची तपासणी केली असता टाटा कंपनीची टाटा सुमो गोल्ड या चारचाकी वाहनामध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्डचे गोवा बनावटी मद्याचे एकूण ७५० मिलीच्या …

Read More »

आ. अभय पाटील पालिका आयुक्तांना ब्लॅकमेल करत आहेत : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : आ. अभय पाटील छोट्या गोष्टींना मोठे करत आहेत. पालिका आयुक्तांना ते ब्लॅकमेल करत आहेत. बेळगावच्या महापौर सोमनाचे या आमदार अभय पाटील यांच्या हातचे बाहुले बनल्या आहेत असा सनसनाटी आरोप सार्वजनिक बांधकाम खात्याचे व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केला. बेळगाव महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री जारकीहोळी …

Read More »

सीमोल्लंघन नियोजनासाठी बैठक

  बेळगाव : बेळगाव शहरातील ज्योती कॉलेज मैदानावर पारंपरिक पद्धतीने दरवर्षी होणाऱ्या रितिरिवाजाप्रमाणे सीम्मोल्लंघन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिद्ध भैरवनाथ मंदिरात शनिवारी सायंकाळी शहरातील पारंपरिक पद्धतीने ज्योती कॉलेज मैदानावर होणारे सीम्मोल्लंघन वेळेत पूर्व व्हावे याचे नियोजन करण्यासाठी शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण- पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियोजन बैठकीचे आयोजन …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात ९० वाढीव मतदान केंद्रे

  बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीत सुसूत्रपणा आणण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी. असा प्रस्ताव राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यास मंजुरी दिली असून, बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी १२ विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांची …

Read More »

शेतकरी महिलांसाठी बस थांबवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

  बेळगाव : शिवारात विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या शेतकरी महिलांसाठी बस थांबवावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी परिवहन अधिकारी के. के. लमाणी यांना दिला. वडगाव, शहापूर आदी भागातील शेतकरी आणि महिला आपल्या शिवारात विविध कामांसाठी जात असतात. मात्र, शेतकरी महिलांनी हात करूनही बस थांबविली जात नाही. त्यामुळे महिला शेतकऱ्यांची अडचण …

Read More »

बिजगर्णीत दोन गटांत वादावादी; सहा जणांवर गुन्हे दाखल

  बेळगाव : पुढील वर्षी बिजगर्णी (ता. बेळगाव) येथे महालक्ष्मी यात्रा भरविण्याबाबत शुक्रवारी (ता. २०) दुपारी झालेल्या बैठकीतील वादावादीनंतर रात्री पुन्हा दोन गटांत हाणामारी झाली. त्यात काहीजण किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी सहाजणांवर वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बिजगर्णी गावात यंदा …

Read More »

घरपट्टी वाढीच्या ठरवावरून महानगरपालिकेत आरोप-प्रत्यारोप

  बेळगाव : घरपट्टी वाढीच्या मुद्यावरून महापौरांना आलेल्या कारणे दाखवा नोटीशीमुळे महापालिकेचे राजकारण चांगलेच तापले असून आमदार अभय पाटील आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील संघर्ष वाढला आहे. परिणामी महापालिकेच्या बरखास्तीची शिफारस सरकारकडे करू, अशा इशारा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे. घरपट्टी वाढीच्या ठरावात मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी फेरफार …

Read More »

बीडी येथे भरदिवसा चोरी; सहा तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये रोकड लंपास

  खानापूर : भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि ऐवज लांबविल्याची घटना बीडी येथे घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बीडी सागरे रोडवरील शासकीय विश्रामधामच्या शेजारी असलेल्या शेखर गुरुपदा हलशी यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला आहे. शेखर हलशी हे सायंकाळी चारच्या सुमारास साहित्य आणण्यासाठी घर बंद …

Read More »

फरार सोयाबीन व्यापाऱ्याच्या शोधासाठी शेतकऱ्यांचे मंडल पोलीस निरीक्षकांना तक्रार अर्ज

  निपाणी (वार्ता) : भिवशी येथील सोयाबीन व्यापारी संजय भिमगोंडा पाटील यांनी निपाणी परिसरासह महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून रक्कम न देताच कुटुंबीयसह बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊन शेतकऱ्यांना त्यांची रक्कम परत मिळावी या मागणीचे तक्रार अर्ज मंडल पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना फसगत झालेल्या बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी …

Read More »