Tuesday , April 21 2026
Breaking News

बीडी येथे भरदिवसा चोरी; सहा तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये रोकड लंपास

Spread the love

 

खानापूर : भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि ऐवज लांबविल्याची घटना बीडी येथे घडली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बीडी सागरे रोडवरील शासकीय विश्रामधामच्या शेजारी असलेल्या शेखर गुरुपदा हलशी यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला आहे. शेखर हलशी हे सायंकाळी चारच्या सुमारास साहित्य आणण्यासाठी घर बंद करून दुकानाला गेले होते ती संधी साधून चोरट्याने हलशी यांच्या घराचे कुलूप तोडून सहा तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये रोकड लंपास केले आहेत. सायंकाळी 4.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. अवघ्या 35 मिनिटात चोरट्यानी संधी साधून चोरी केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे वृत्त समजताच नंदगड पोलीस निरीक्षक सी. एस. पाटील कॉन्स्टेबल श्रीनिवाससह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. नंदगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *