Sunday , July 26 2026
Breaking News

शेतकरी महिलांसाठी बस थांबवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : शिवारात विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या शेतकरी महिलांसाठी बस थांबवावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी परिवहन अधिकारी के. के. लमाणी यांना दिला.

वडगाव, शहापूर आदी भागातील शेतकरी आणि महिला आपल्या शिवारात विविध कामांसाठी जात असतात. मात्र, शेतकरी महिलांनी हात करूनही बस थांबविली जात नाही. त्यामुळे महिला शेतकऱ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे राजू मरवे यांच्यासह शेतकऱ्यांनी परिवहन विभागाचे अधिकारी लमाणी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी लमाणी यांनी शेतकरी महिलांना बसमध्ये न घेतल्यास त्या बसचा क्रमांक द्यावा. संबंधित वाहकावर तातडीने कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी बस थांबविली जात नाही. त्यामुळे शेतकरी, महिलांसह आंदोलनाचा इशारा दिला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *