Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

निपाणी महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील धार्मिक कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता

  निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्या निमित्त येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी (ता.१४) महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. प्रारंभी बसवप्रभूस्वामी यांच्या उपस्थितीत डॉ. महेश ऐनापुरे व ज्योती ऐनापुरे दाम्पत्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. बसवप्रभू स्वामी, हालशुगर संचालक महालिंग कोठीवाले यांच्या हस्ते …

Read More »

काँग्रेस सत्तेसाठी युवक काँग्रेसचे कार्य महत्त्वाचे

  लक्ष्मणराव चिंगळे; चिकोडी जिल्हा युवक काँग्रेसची सभा निपाणी (वार्ता) : पक्ष संघटना मजबूत असल्याने होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार आहेत. त्यासाठी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. राज्यात काँग्रेस सत्ता येण्यासाठी युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. हे लक्षात घेऊन पुन्हा या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य …

Read More »

जायन्ट्स ग्रुपतर्फे श्रीमूर्ती व उत्कृष्ट देखावा स्पर्धा

  बेळगाव : येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ बेलगाम (मेन) या संघटनेतर्फे गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट श्रीमूर्ती व उत्कृष्ट देखावा स्पर्धा यंदाही आयोजित करण्यात आल्या आहेत. बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर या विभागासाठी स्वतंत्रपणे या स्पर्धा होणार असून दोन्ही विभागात दोन्ही स्पर्धांसाठी पहिले तीन क्रमांक काढण्यात …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे जायंट्स सप्ताह निमित्त विविध स्पर्धा

  बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे जायंट्स सप्ताह निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 1)ज्येष्ठ नागरिकांसाठी पोहण्याच्या स्पर्धा : या स्पर्धा आबा स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने गोवावेस स्विमिंग पूलवर 17 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहन सप्रे हे …

Read More »

ज्येष्ठ नागरिक बेळगाव जिल्हा सांस्कृतिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा आयोजन

  खानापूर : रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता माहेश्वरी अंध विद्यालय क्रीडांगण बेळगाव या ठिकाणी बेळगाव जिल्हा उपनिर्देशक महिला बालकल्याण व ज्येष्ठ नागरिक यांचे निर्देशानुसार प्रशासनामार्फत वरील स्पर्धा नियोजित केले आहे. तसेच बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना व बेळगाव जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील उपघटक ज्येष्ठ नागरिक संघटना …

Read More »

गणेशोत्सव, ईद सणांनिमित्त शांतता -नागरिक समितीची बैठक संपन्न

  बेळगाव : आगामी श्री गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शहरातील सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांनी सौहार्दपूर्ण वातावरणात कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेत ऐक्याने साजरे करावेत, असे आवाहन खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी केले. येत्या श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता …

Read More »

श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या वतीने प्रतिभा कारंजी व क्रीडा स्पर्धेमधील विजेत्यांचा गौरव

  बेळगाव : येळ्ळूर विभाग प्राथमिक शाळेच्या 2023-24 सालातील प्रतिभा कारंजी व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचे संस्थेचे सचिव श्री. प्रसाद मजुकर यांनी प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरव केला. पहिली ते सातवी मध्ये भक्तीगीत प्रथम शिवण्या मुचंडी तर दुर्वा पाटील. कन्नड कंठ पाठ आरुष बीजगरकर तर सेजल घाडी. कथाकथनमध्ये श्रावणी पाटील आणि भक्ती …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ‘सद्गुरु’च्या तनुजा पाटीलची निवड

    निपाणी (वार्ता) : येथील श्रीपेवाडी रोडवरील व्हीएसएम आयटी कॉलेज येथे पीयुसी जिल्हास्तरीय तायक्वांदो, ज्युदो व कराटे स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत तायक्वांदो या क्रीडा प्रकारात ५९ किलो वजन गटात मुलींच्या गटामध्ये सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीच्या तनुजा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. …

Read More »

श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सोसायटीला रु. 10.55 लाखाचा नफा

  बेळगाव : श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सहकारी नियमित, महाद्वार रोड बेळगाव या संस्थेत गेल्या आर्थिक वर्षात 10 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष श्री. सुभाष देसाई यांनी दिली. संस्थेची 13वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 14/09/2023 रोजी श्री. सुभाष लक्ष्मण देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीत पार …

Read More »

अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगेंच उपोषण मागे

  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण अंतरवाली सराटी (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्‍वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती यावेळी पाहायला मिळत आहे. …

Read More »