Monday , September 21 2026
Breaking News

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे जायंट्स सप्ताह निमित्त विविध स्पर्धा

Spread the love

 

बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे जायंट्स सप्ताह निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 1)ज्येष्ठ नागरिकांसाठी पोहण्याच्या स्पर्धा : या स्पर्धा आबा स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने गोवावेस स्विमिंग पूलवर 17 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहन सप्रे हे राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अर्ष अनाथाश्रम, शांतीनगर टिळकवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे.
2) शालेय विद्यार्थ्यांसाठी भाकरी बनविण्याची स्पर्धा, या स्पर्धा जायंट्स भवन, कपिलेश्वर रोड बेळगाव येथे शनिवार दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहेत. 3) त्याच दिवशी चित्रकला स्पर्धा इयत्ता पाचवी ते सहावी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात होणार आहे
4) 24 सप्टेंबर रोजी 17 वर्षाखालील विद्यार्थिनींसाठी कबड्डी स्पर्धा बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी येथे होणार आहेत. संपर्क उमेश बेळगुंदकर, फोन 8951168497,
5) त्याच दिवशी तेथेच विद्यार्थिनींसाठी कुस्ती स्पर्धा दुपारी तीन वाजता होणार आहेत. संपर्क : मारुती घाडी सर 9449479090.
6) 25 सप्टेंबर रोजी विटी दांडू, गोट्या, पोत्यातील उड्या, टायर पळवणे, दोरीच्या उड्या वगैरे पारंपारिक खेळ होणार आहेत
7) 6 ऑक्टोबर 2023 रोजी अंध मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा, बालिका आदर्श विद्यालय येथे होणार आहेत या स्पर्धा संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास जायंट्सचे अध्यक्ष सुनील मुतकेकर यांना 9972203720 किंवा सचिव लक्ष्मण शिंदे यांना 9845389352 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *