Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल

  अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळले नवी दिल्ली : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत. शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले असून अजित …

Read More »

निपाणी चव्हाण वाड्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

  निपाणी (वार्ता) : येथील चव्हाण वाड्यातील दर्गा प्रस्थापित श्री. संत बाबामहाराज चव्हाण समाधी स्थळी कृष्ण जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह सुंठवडा वाटप कार्यक्रम पार पडला. याशिवाय श्री. संत बाबामहाराज चव्हाण भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला. नंदा रमेश देसाई -सरकार, सरिता बाळासाहेब देसाई -सरकार नम्रता सुजय …

Read More »

श्रीमंत सिद्धोजीराजे सरकार राजवाड्यात श्रीफळ शिवलिंग महाजप कार्यक्रम

    निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यात श्रावण मासानिमित्त अंबाबाई चौकातील श्री. आदिशक्ती व शिवशक्तीचा श्रीफळ शिवलिंग महाजप कार्यक्रम झाला. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते नारळापासून बनवलेल्या महादेवाच्या पिंडीची पूजा करण्यात आली. यावेळी नागरिकांनी भावी काळात एक परिस्थिती चांगली राहण्यासाठी दीड तास महादेवाचा जप केला. …

Read More »

जेडीएस- भाजप युतीला अमित शहांचा ग्रीन सिग्नल?

  बेंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यात जेडीएस सोबत युती करत असल्याच्या चर्चेला माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पडदा टाकला. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी पुष्टी केली की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयाला आधीच ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. …

Read More »

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

  बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा बुधवारी सायंकाळी फौंड्री क्लस्टर येथे संपन्न झाला. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन अध्यक्षपदी सी. सी. होंडदकट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी, कीथ मचाडो, सचिव राजेंद्र मुतगेकर, खजिनदार रोहित कपाडिया यांची 2023-24 या वर्षाकरिता …

Read More »

जिल्हा पंचायत, तालुका पंचायत मतदारसंघाची पुनर्रचना

  बेळगाव तालुका पंचायतचे १० मतदार संघ घटवले बेळगाव : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कर्नाटक पंचायत राज मतदर संघ निर्णय आयोगाने विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील जिल्हा पंचायत मतदार संघांची संख्या निश्चित केली असून, त्याची यादी प्रकाशित केली आहे. …

Read More »

सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अपघातात मृत्यू

  अथणी : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाचा काल रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला. अथणी तालुक्यातील नदि-इंगळगाव गावचे सैनिक असलेले लक्ष्मण घोरपडे हे सुटीच्यानिमित्त गावी आले होते. त्यातच त्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. शहीद जवानाच्या पार्थिवावर शुक्रवारी …

Read More »

धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस रेल्वे बेळगावपर्यंत वाढविली

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची जुनी असलेली मागणी पूर्ण झालेली असून धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस रेल्वे बेळगावपर्यंत वाढविण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले असल्याची माहिती राज्यसभा खासदार ईराण्णा कडाडी यांनी दिली. खासदार ईराण्णा कडाडी यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रेल्वे क्रमांक 17302 बेळगावहून सायंकाळी 7:45 वाजता …

Read More »

शनिवारी निपाणीत वीज, पाणीपुरवठा खंडित

  बेनाडी, जत्रांटमध्येही वीज बंद : दिवसभर दुरुस्तीची कामे निपाणी (वार्ता) : हेस्कॉमकडून शनिवारी (ता.९) दिवसभर येथील चिक्कोडी रोडवरील विद्युत केंद्र आणि बेनाडी, जत्राट येथील विद्युत केंद्रामध्ये दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे दिवसभर वीजपुरवठा खंडित होणार आहे. शहराला पाणी पुरवणाऱ्या जवाहर तलावावर आणि यमगर्णी जॅकवेल परिसरातही वीज खंडित केली जाणार …

Read More »

बलिदानातून उभारलेला भारत वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची गरज

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या; समाजात फूट पाडण्याचे काम होत असल्याचा आरोप बंगळूर : प्रशासनाचे अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये परस्पर द्वेषाची पेरणी करून जाती-धर्माच्या आधारे समाजात फूट पाडण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपले जाते. याविरुद्ध एकत्रित लढा उभारण्याची गरज आहे. बलिदानातून उभारलेला भारत वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची …

Read More »