Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा बुधवारी सायंकाळी फौंड्री क्लस्टर येथे संपन्न झाला.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन अध्यक्षपदी सी. सी. होंडदकट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी, कीथ मचाडो, सचिव राजेंद्र मुतगेकर, खजिनदार रोहित कपाडिया यांची 2023-24 या वर्षाकरिता निवड झाली असून, त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष हेमचंद्र पोरवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष राम भंडारे, जिल्हा उद्योग केंद्राचे उपसंचालक सत्यनारायण भट उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय आनंद देसाई व सतीश कुलकर्णी यांनी करून दिला. स्वागतगीत संजना हिने सादर केले.
माजी अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांनी आपल्या कारकीर्दीचा आढावा घेऊन नूतन अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी व कार्यकारिणीला अधिकार प्रदान केले. नूतन अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी यांचा श्रीधर उप्पीन यांनी तर सचिव कीथ मचाडो यांचा उदय जोशी यांनी परिचय करून दिला. नूतन अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी यांनी आपल्या पुढील काळातील विविध संकल्पना मांडल्या. प्रमुख पाहुणे सत्यनारायण भट यांनी बेळगावातील उद्योजकांचे कौतुक करुन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा फायदा करून घ्यावा असे सांगितले. प्रमुख पाहुणे राम भंडारे यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन एमएसएमईबद्दल तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या सांगितल्या.
नूतन कार्यकारिणीला व्यापारी प्रतिनिधी सर्वश्री स्वप्नील शहा, विजय दरग शेट्टी, प्रशांत कळ्ळीमनी, मनोज मत्तीकोप, अमर गाडवी, युवराज हुलजी, संजय पोतदार, विक्रम जैन, भूपेंद्र पटेल, बसवराज बागी, सचिन हंगिरगेकर, वैभव वेर्णेकर तसेच औद्योगिक विभाग सर्वश्री प्रभाकर नागमुन्नोळी, दिलीप चांडक, उदय जोशी, सचिन सबनीस, आनंद देसाई, विनीत हरकुणी व वार्षिक सामान्य सभासद सुधीर चौगुले यांची निवड करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष विकास कलघटगी, बसवराज जवळी, दिलीप तिळवे, रोहन जुवळी, महेश बागी, बाळाण्णा कग्गणगी, प्रशांत जेडी, राजेंद्र हरकुणी, लघु उद्योग संस्थेचे महादेव चौगुले आदी उपस्थित होते.
विक्रम जैन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सचिव कीथ मचाडो यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *