Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायरचा संशयास्पद मृत्यू; घरातच आढळला मृतदेह

  चेन्नई : मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपर्णा नायर राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. 31 वर्षीय अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. अपर्णा नायरची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपर्णा नायरने निधनाच्या काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर …

Read More »

लाईफ टॅक्समध्ये वाढीच्या निषेधार्थ ट्रक चालकांचा सोमवारी बंद

  बेळगाव : कर्नाटक सरकारने लाईट कमर्शियल वाहनांवरील आजीवन करत तिपटीने वाढ केल्याच्या निषेधार्थ आणि हा कर पूर्णतः मागे घेण्याच्या मागणीसाठी मालवाहू वाहनांच्या मालकांनी येत्या सोमवारी बंद पुकारला आहे. या संदर्भात लॉरी असोसिएशनच्या सदस्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून सरकारच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना असोसिएशनचे सदस्य …

Read More »

प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या निपाणी विभाग अध्यक्षपदी सदाशिव वडर

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ संघाच्या निपाणी तालुका निपाणी विभागाची बैठक भास्कर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये निपाणी विभागाच्या नूतन अध्यक्षपदी सदाशिव मारुती वडर, उपाध्यक्षपदी प्रकाश पाडुरंग कांबळे, महिला उपाध्यक्ष पदी सुनिता नरसिंगा प्रताप, सेक्रेटरीपदी परशुराम पाटील यांची निवड करण्यात आली. सहाय्यक सेक्रेटरीपदी कावेरी खाडे, …

Read More »

तोपिनकट्टीचे कल्लाप्पा तिरवीर ठरले सुवर्णपदकाचे मानकरी

  खानापूर : गोवा राज्यातील करसवाडा, म्हापसा गोवा येथे नुकताच पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ३ किलोमीटर खुला गटामध्ये ५० वर्षा वरील गटात तोपिनकट्टी (ता. खानापूर) गावचे धावपटू कल्लापा मल्लापा तिरवीर (वय ५४) यांनी सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक पटकावला. धावपटू कल्लापा तिरवीर हे व्यवसायानिमित्ताने कोल्हापूर येथे स्थायिक आहेत. त्याचे प्राथमिक व माध्यमिक …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या कर्मचारी आंदोलनाला आमदारांच्या निर्णयाने झाला शेवट

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार व कर्मचारी वर्गाच्या आंदोलनाला खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या निर्णयाने आंदोलनाला पूर्णविराम मिळाले. याबाबतची माहिती अशी, खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या मनमानी कारभाराला स्वच्छता कामगार, नगरपंचायतींचे कर्मचारीवर्ग कंटाळले. त्यामुळेच स्वच्छता कामगार युनियनने शुक्रवारी सकाळपासुन नगरपंचायतीच्या कार्यालयाला टाळे टोकून …

Read More »

कावळेवाडीच्या रवळनाथ कणबरकर याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील उदयोन्मुख पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने बेळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे. जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रवळनाथ कणबरकर यांनी 80 किलो वजनी गटाची अंतिम फेरी जिंकून विजेतेपद मिळवल्याने त्याची राज्यस्तरीय निवड …

Read More »

राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मैत्रेयी शिंदेला उपविजेतेपद

  बेळगाव : कर्नाटक कायदा विद्यापीठ हुबळी यांच्या कर्नाटक कायदा महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मैत्रेयी शिंदे व महंत यांच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. नयानगर, हुबळी येथील महाविद्यालयाच्या सभागृहात दि. 26 व 27 ऑगस्ट रोजी या 9 व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …

Read More »

कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून सफाई कामगाराची आत्महत्या

  बेळगाव : कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून ज्योती नगर, गणेशपूर येथील एका सफाई कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. आत्महत्या केलेल्या सफाई कामगाराचे नाव शशिकांत सुभाष ढवाळे (वय 28, रा. ज्योतीनगर गणेशपुर) असे आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शशिकांत हा गेल्या दहा ते बारा वर्षापासून महानगरपालिकेत …

Read More »

खानापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अबनाळी शाळेला दुहेरी विजेतेपद

  खानापूर : खानापूर शहरातील सर्वोदय शाळेच्या पटांगणावर झालेल्या खानापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक तसेच मुलींच्या संघानेही थ्रो बाॅल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. एकंदरीत मुलांच्या संघाने सतत पाचव्यांदा व मुलींच्या संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवत थ्रो बॉल क्रीडा प्रकारातील आपले वर्चस्व कायम …

Read More »

खानापूर वकील संघटनेचा नगरपंचायतीच्या कर्मचारी युनियनला पाठींबा

  सी ओ. ची हकालपट्टी हाच निर्णय ऍड. ईश्वर घाडी खानापूर : खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या मनमानी कारभाराला स्वच्छता कामगार, नगरपंचायतींचे कर्मचारीवर्ग कंटाळले. त्यामुळेच स्वच्छता कामगार युनियनने शुक्रवारी सकाळपासून नगरपंचायतींच्या कार्यालयाला टाळे टोकून आंदोलन छेडले. त्या आंदोलनाला खानापूर तालुका वकील संघटनेचा पाठिंबा व्यक्त करत नगरपंचायतींचे चीफ …

Read More »