Sunday , July 26 2026
Breaking News

तोपिनकट्टीचे कल्लाप्पा तिरवीर ठरले सुवर्णपदकाचे मानकरी

Spread the love

 

खानापूर : गोवा राज्यातील करसवाडा, म्हापसा गोवा येथे नुकताच पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ३ किलोमीटर खुला गटामध्ये ५० वर्षा वरील गटात तोपिनकट्टी (ता. खानापूर) गावचे धावपटू कल्लापा मल्लापा तिरवीर (वय ५४) यांनी सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक पटकावला.
धावपटू कल्लापा तिरवीर हे व्यवसायानिमित्ताने कोल्हापूर येथे स्थायिक आहेत. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तोपिनकट्टी येथे पूर्ण झाले आहे.
कोल्हापूर याठिकाणी सततच्या प्रयत्नाने व ज्योती क्लब बेळगांव याच्या सानिध्यात गर्लगुंजी क्लबचे संस्थापक कोच एल. जी. कोलेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच खानापूर तालुक्यातुन त्याचे अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *