Monday , September 21 2026
Breaking News

लाईफ टॅक्समध्ये वाढीच्या निषेधार्थ ट्रक चालकांचा सोमवारी बंद

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक सरकारने लाईट कमर्शियल वाहनांवरील आजीवन करत तिपटीने वाढ केल्याच्या निषेधार्थ आणि हा कर पूर्णतः मागे घेण्याच्या मागणीसाठी मालवाहू वाहनांच्या मालकांनी येत्या सोमवारी बंद पुकारला आहे.
या संदर्भात लॉरी असोसिएशनच्या सदस्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून सरकारच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना असोसिएशनचे सदस्य संजय गोटाडकी यांनी सांगितले की, 7 टनांपर्यंतची मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर आकारल्या जाणाऱ्या लाईट कमर्शियल वाहनांवर सरकारने आजीवन करात जबरी वाढ केली आहे. याला विरोध करून हा कर पूर्णतः मागे घेण्याच्या मागणीसाठी आम्ही निदर्शने करून बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. लॉरी असोसिएशनच्या वतीने 7 टनांपर्यंतची मालवाहतूक करणाऱ्या एलसीव्ही वाहनांवर आजीवन कर मागे घेण्याची मागणी या निवेदनात केली आहे. सरकारने आजीवन करात तिपटीने वाढ केली हा आमच्यावर अत्यंत अन्याय आहे. आधी त्यांनी 15 वर्षे जुनी वाहने भंगारात टाकली. आता 50 ते 60 हजार रुपये असणारा आजीवन कर चक्क 1 लाख 50 हजार रुपयांवर नेऊन ठेवला आहे. तो रद्दच करावा अशी आमची मागणी आहे. ती मान्य न केल्यास, आम्ही फळे, दूध, भाजीपाला घेऊन जाणारी वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून कायद्याच्या चौकटीत शांततेने आंदोलन करू, असे ते म्हणाले.

यावेळी बेळगाव शहरातील लॉरी असोसिएशनच्या सदस्यांनी, आजीवन कर मागे घेण्याचे निवेदन बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यामार्फत शासनाला दिले.
यावेळी संजय गोटाडकी, गुरुदेव पाटील, हेमंत लेंगडे यांच्यासह लॉरी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *