खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खानापूर-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मारूती मंदिरजवळ रस्त्याला लागुन धोकादायक वृक्ष उभा आहे. या वृक्षामुळे अपघात होण्याचा संभव आहे.
नुकताच जत- जांबोटी महामार्गावरील डांबरीकरणांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात आल्याने वृक्ष रस्त्याला लागुन हा वृक्ष वाहनधारकांना धोक्याचा झाला आहे. रात्रीअपरात्री वाहन वेगाने धावतात. अशा वेळी वाहनाची धडक बसुन अपघात होण्याचा संभव आहे. तेव्हा हा धोकादायक वृक्ष काढणे गरजेचे आहे. न झाल्यास कुणााचा तरी जीव जाण्याची वेळ येणार. तेव्हा संबंधीत सार्वजनिक बांधकाम खात्याने हा धोकादायक वृक्ष तोडावा. व भविष्यात होणारा धोका टाळावा, अशी मागणी शहरासह जांबोटी मार्गावरील वाहनधारकातून होत आहे.
