बेळगाव : ‘ज्या संस्थांमध्ये कारभार पारदर्शक असतो अशा संस्थांना सहकार्य करण्यास नेहमीच लोक पुढे येतात. अशा संस्थापैकी घुमटमाळ मारुती मंदिर ही एक संस्था आहे’ असे उदगार श्री. नारायण शट्टूप्पा पाटील यांनी बोलताना काढले. घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या पुजारी निवासाचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला त्याप्रसंगी पाहुणे म्हणून श्री. नारायण पाटील व उद्योजक जनार्दन लक्ष्मणराव सदावर हे उपस्थित होते.
प्रारंभी मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष अनंत लाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून पुजारी निवास उभारणीसाठी सहकार्य करीत असलेल्या अनेक देणगीदारांचे आभार मानले. नारायण पाटील यांचा अध्यक्षांच्या हस्ते तर जनार्दन सदावर यांचा उपाध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दोन्ही पाहुण्यांच्या हस्ते मारुती मूर्तीचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांनी श्रीफळ वाढवून मशीनचे पूजन केले
याच कार्यक्रमात नुकतेच बहात्तराव्या वर्षात पदार्पण केलेल्या गोपाळराव बिर्जे व अभियंता सुनिल चौगुले, कॉन्ट्रॅक्टर बाबू हणमंताचे आदींचा सत्कार करण्यात आला. मारुती मंदिर कमिटीने चालेल या उपक्रमाचे श्री. सदावर यांनी आपल्या भाषणात कौतुक केले. पुजारी निवास बांधकामासाठी या दोन्ही पाहुण्याने प्रत्येकी अकरा हजार रुपये रोख देणगी दाखल दिले. याशिवाय या कामासाठी जवेर नानजी पटेल व बंधू, बाळासाहेब धामणेकर व बंधू, सौ. कल्पना चांडक, एच. डी. काटवा, प्रेमानंद गुरव, सुनिल हलगेकर, विलास परशराम बिर्जे, राहुल बांडगी व सचिन सामजी आदींनी सहकार्य केले आहे.
याप्रसंगी सेक्रेटरी कुलदीप भेकणे, रघुनाथ बांडगी, संभाजी चव्हाण, नेताजी जाधव, बाबुराव पाटील, मोहन मेलगे, चंद्रकांत पवार, प्रकाश महेश्वरी, विक्रम चिंडक, ऍड. के. एस. साळवी यांच्यासह बाळू किल्लेकर आदी उपस्थित होते.