बेळगाव : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे डॉक्टर्स डे निमित्त शहरातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दु होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.
प्रथम कोरोनामुळे प्राण गमावलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ईशस्तवन डॉक्टर मरियम तेबला यांनी सादर केले.
फाऊंडेशनच्या अध्यक्षा माधुरी जाधव- पाटील यांनी प्रास्ताविक करून कोरोना काळात केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी महावीर ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यलबुर्गी, कॅम्प हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र अनगोळ, सिव्हील हॉस्पिटलच्या आरटीपीसीआर टेस्ट विभागाच्या डॉक्टर रूपाली शिंदे, सिव्हील हॉस्पिटलचे त्वचारोग तज्ञ डॉक्टर सुश्रुत कामोजी व एकल अभियानच्या डॉक्टर वैशाली कित्तुर आदींचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रमुख पाहुणे डॉक्टर अनिल पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष डॉक्टर राजश्री अनगोळ, सचिव आरती निपाणीकर, खजिनदार ज्योती मिरजकर, सहखजिनदार योगिता पाटील, उपसचिव स्मिता शिंदे, यांच्यासह विनय पाटील, रिषभ अवलक्की, शाहबाज जमादार, श्रीनिवास गुडमट्टी, संतोष तालपत्तुर, अमित पाटील, सुहास हुद्दार यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
Check Also
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …