Monday , December 4 2023

कापोली ते कोडगई रस्त्याची दयनीय अवस्था!

Spread the love

रस्त्याची डागडुजी न केल्यास खानापूर तालुका युवा समिती आंदोलन करणार

खानापूर : कापोली ते कोडगई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी कापोली ते कोडगई या रस्त्यावर फक्त मुरूम टाकण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार कै. अशोक पाटील यांच्या प्रयत्नातून रस्त्याची डागडुजी व डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांची अडचण दूर झाली होती मात्र काही वर्षांनी पुन्हा रस्ता खराब झाल्याने माजी आमदार अरविंद पाटील यांनी पुन्हा रस्त्याची डागडुजी करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली असून रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून दुचाकी व चार चाकी चालविणे मुश्कील झाले आहे. त्याचबरोबर नागरिकांना चालत जाणेही मुश्किल बनले आहे. याबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य संभाजी देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत सातत्याने माहिती दिली आहे. तरीही ग्रामस्थांच्या मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे कापोली, शिंदोळी बि के, शिंदोळी के एच, शिवठाण, कोडगई, सुवातवाडी, चिंचेवाडी, कुंभार्डा, कुंभार्डा मठ, या गावांना याचा फटका बसत आहे, त्यामुळे याबाबत वेळीच लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी न केल्यास खानापूर तालुका युवा समितीच्या माध्यमातून या परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरात पत्रके वाटून महामेळाव्याची जनजागृती

Spread the love  खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *