Thursday , November 14 2024
Breaking News

पक्षात गोंधळ नाही, आम्ही सारे संघटित

Spread the love

मुख्यमंत्री येडियुराप्पा : अरुण सिंगांच्या आगमनाविषयी औत्सुक्य
बंगळूरू : आमच्यामध्ये कोणताच गोंधळ नाही, आम्ही सर्वजण संघटित आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज येथे केले. भाजपचे राज्य प्रभारी अरुणसिंग यांच्या राज्य भेटीच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य उत्सुकतेचे कारण ठरले आहे. दरम्यान, येडियुराप्पा विरोधकानी आपल्या हालचाली सुरूच ठेवल्या आहेत.
बंगळुरुमध्ये मंगळवारी बोलताना येडियुराप्पा म्हणाले, अरुण सिंग उद्या (ता.16) राज्यात येणार आहेत. आमच्या पक्षात कोणताही गोंधळ नाही. तथापि, कुणीही अरुण सिंगांची भेट घेऊन आपला अभिप्राय देऊ शकेल.
अरुण सिंग यांच्यासमवेत दुसर्‍या निरिक्षकांना पाठवण्याच्या विरोधकांच्या आग्रहाला उत्तर देताना ते म्हणाले, अनावश्यक प्रश्न विचारू नका. अरुण सिंग हे राज्याचे प्रभारी आहेत. ते सर्वांशी दीर्घकाळ चर्चा करतील. कोणीही त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करू शकेल.
माध्यमांनी या प्रकरणाबद्दल गोंधळ निर्माण करू नये. पक्षात नेतृत्वावरूनही गोंधळ नाही. आम्ही कोणत्याच गोंधळात नाही, पक्षातील नेतृत्त्वाबद्दल आपण गोंधळात पडत नाही, आम्ही एकजूट आहोत. जर कोणाला कांही त्रास असेल तर अरुण सिंग त्यांना बोलावून चर्चा करतील.
भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंग बुधवारी राज्यात दाखल होतील. ते 16 जून रोजी मंत्र्यांसमवेत बैठक घेतील आणि 17 जून रोजी खासदारांशी स्वतंत्र चर्चा करतील. 18 जून रोजी भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे.
दरम्यान, भाजपमधील असंतुष्टांच्या हालचाली थांबलेल्या नाहीत. त्यांची येडियुराप्पा विरोधी रणनिती सुरूच आहे. उद्या अरुण सिंग बंगळूरात आल्यानंतर ते नेमकी कोणती भुमिका घेणार याविषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य वाढले आहे.
त्या 17 आमदारांमुळे गोंधळ
भाजप हा शिस्तप्रीय पक्ष आहे. पक्षात बेशिस्त सहन केली जाणार नाही, असे सांगून भाजपचे वरिष्ठ नेते व ग्रामीण विकास व पंचायत राज्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केले. राज्यात भाजप सरकार सत्तेवर येण्यास कारणीभुत ठरलेल्या व काँग्रेस, धजदमधून भाजपमध्ये आलेल्या 17 आमदारांवरच त्यांनी तोफ डागली. हे आमदार भाजपात आल्यानेच पक्षात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले हे खरे आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त कण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राज्यातील ११ अधिकाऱ्यांच्या ४० ठिकाणावर लोकायुक्त छापे

Spread the love  महत्वाची कागदपत्रे, मालमत्ता, मौल्यवान वस्तू ताब्यात बंगळूर : कर्नाटक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *