बेंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी रविवारी येथे सांगितले की, कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने लॉकडाऊन वाढीसंदर्भात कोणतीही शिफारस केली नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान राज्यात कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन कायम ठेवण्यावर विचार सुरु आहे.
दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी, कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन वाढविण्याच्या बाबतीत कोणताही निर्णय झाला नसून सध्याचा लॉकडाऊन संपण्याच्या दोन दिवस अगोदर त्यांचे सरकार ५ जूनला लॉकडाऊन वाढविण्याच्या निर्णयावर विचार करेल, असे ते म्हणाले होते.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने राज्यात पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला. दरम्यान राज्यात १० मे ते २४ मे पर्यंत पूर्ण लॉकडाऊन लागू केला होता. त्यांनतर पुन्हा लॉकडाऊन वाढवून ७ जूनपर्यंत केला. राज्यात लॉकडाऊननंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. परंतु राज्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील कोरोनावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, राज्यात ७ जूननंतर लॉकडाऊन कायम राहणार का याबाबत निर्णय झाला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Check Also
मुनिरत्ननने दोन माजी मुख्यमंत्र्यांना अडकविले हनीट्रॅपच्या जाळ्यात
Spread the loveपीडितेकडून स्फोटक माहिती; संरक्षण दिल्यास व्हिडिओ देण्याची ग्वाही बंगळूर : माजी मंत्री आणि …