10 कोटीच्या कृती आराखड्यास मंजूरी : 46 वारसा स्थळांच्या विकासास मान्यता
बंगळूरू : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मंगळवारी नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या स्मरणार्थ 46 वारसा स्थळांच्या विकासास मान्यता दिली. 223 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखालील केम्पेगौडा विकास मंडळाच्या आढावा बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी एकूण 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून कित्तूर विकास मंडळाच्या 10 कोटींच्या कृती आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली.
दरम्यान, येडियुराप्पा यांनी कित्तूर विकास मंडळ आणि कुडलसंगम विकास मंडळासमवेत आढावा बैठक घेतली. कुडलसंगम येथील बसव आंतरराष्ट्रीय संग्रहालयाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले. संग्रहालयाच्या कामाचा पहिला टप्पा 94 कोटी रुपये खर्च येईल.
शिवाय, कित्तूर विकास मंडळाच्या 10 कोटींच्या कृती आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. कित्तूरमध्ये ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी एकूण 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून त्यापैकी चालू आर्थिक वर्षासाठी 10 कोटी रुपये देण्यात आले आहेत. जी कामे हाती घेतली जातील त्यात राणी चन्नम्मा यांचे स्मारक आणि कित्तूर पॅलेसची प्रतिकृतीही बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राजवाड्याच्या बांधकामासाठी अधिार्यांना पुरातत्व विभागाशी समन्वय साधण्यास सांगितले.
सध्या अस्तित्वात असलेला राजवाडा पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. या क्षेत्राच्या पर्यटन विकासाच्या हितासाठी त्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारी प्रतिकृती तयार केली जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
पर्यटन सर्किट, ज्यासाठी आधीच एक वैचारिक योजना अस्तित्त्वात आहे, त्यामध्ये बंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, तुमकुर, रामनगर आणि चिक्कबळ्ळापूर या पाच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेली स्थाने असतील. त्यापैकी मागडी टूरिझम सर्किट 132 कोटी रुपये, बंगळूर ग्रामीण 47 कोटी रुपये आणि नंदी सर्किट 44 कोटी रुपये खर्चून विकसित केले जाईल, अशी माहिती एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील केम्पेगौडाचा 108 फूट उंच पुतळा बसविण्याच्या प्रक्रियेतही मंडळाचे काम सुरू असताना, पुतळ्याभोवती थीम पार्क विकसित करण्याची योजना लवकरच सुरू असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
त्याशिवाय, रामनगरातील केम्पपूर गावात केम्पेगौडा स्मारकासाठी सरकार भूसंपादनाच्या प्रक्रियेत आहे. हे स्मारक 32 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी केम्पेगौडा यांच्या जीवनावर आधारित बायोग्राफिकल फिल्म बनवावे, तलावाचे व वारसा स्थळांच्या विकासासह त्याच्या काळात बांधलेले किल्ले विकसित करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. संबंधित सरकारी विभागांशी समन्वय साधून हे घ्यावे लागेल, असे ते म्हणाले.
Check Also
शिवाजी विद्यालय येळ्ळूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिप्रेरणा कार्यक्रम संपन्न
Spread the love येळ्ळूर : येथील श्री शिवाजी विद्यालयामध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव दक्षिण …