Sunday , July 26 2026
Breaking News

हलकर्णीच्या युवकाचा गोवा येथे समुद्रात बुडून मृत्यू

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नोकरीच्या निमित्ताने (हलकर्णी ता. गडहिंग्लज) येथील गोव्यात असणाऱ्या तरुणाचा रविवारी दि. ४ रोजी सायंकाळी समुद्रात बुडून मृत्यू झाला. अनवश शौकत ताशिलदार (वय २३) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
अनवश गेल्या तीन वर्षापासून गोवा येथील एका कंपनीत नोकरीस होता.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तो व त्यांचे दोन मित्र सायंकाळी ५.३० वाजता उथवडा बिचवर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ते पोहण्यासाठी समुद्रात उतरले. पण समुद्राच्या पाण्याचा, खोलीचा आणि लाटेचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. एका तरुणाला बाहेर येण्यासाठी यश आले. गोवा पोलीस प्रशासनाने शोध मोहीम राबवली पण त्यात त्यांना यश आले नाही. सोमवारी रात्री आठ वाजता मुस्‍तकीम शेख (गोवा) यांचा मृतदेह शोधण्यास बचाव पथकाला यश आले. अनवशचा मृतदेह मंगळवारी सकाळी अकरा वाजता सापडला. अनवशच्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच कुटुंबासह हलकर्णी गावावर शोककळा पसरली.

About Belgaum Varta

Check Also

दिशा शिक्षण व विकास केंद्राला नरसू पाटील यांच्या नेतृत्वाची नवी दिशा

Spread the love  अध्यक्षपदी बिनविरोध निवड; शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या विस्ताराचा संकल्प गडहिंग्लज : दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *