Saturday , December 14 2024
Breaking News

तेऊरवाडी येथे अडीच लाखाच्या गोवा बनावटीच्या मद्यासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने कोवाड- नेसरी मार्गावर तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील नवीन वसाहतीजवळ कारवाई करत २ लाख ४४ हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. यावेळी एक चारचाकी, मोबाईल असा सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यावेळी कारवाई होईल या भितीने वाहन चालकांने अंधाराचा फायदा घेत पलायन केले. गाडीत सापडलेल्या कागदपत्रावरून भरत संतू पाटील (रा. हडलगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर ) व अन्य
एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवा बनावटीच्या मद्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वाय. एम. पवार यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रविवारी मध्यरात्री भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी नेसरी-कोवाड रस्त्यावर सापळा रचून गस्त सुरू ठेवली होती. दरम्यान, तेऊरवाडी गावानजीक असलेल्या मराठी शाळेजवळ चारचाकी गाडी अडवली असता भरारी पथकातील कर्मचारी दिसताच चालक कार सोडून पळून गेला. त्या गाडीची तपासणी केली असता त्यात मद्याचे बॉक्स, किमती मोबाईल आणि भरत पाटील यांच्या नावाचा वाहन परवाना आढळला. त्यावरून गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे येथील गाडी आणि २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा, वाहन व मोबाईल असा ६ लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. तर भरत पाटील विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई गडहिंग्लज पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे व राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, कोल्हापूरचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान सर्वश्री संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे, मारुती पोवार, राहुल संकपाळ यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असून पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक संभाजी बरगे यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

कृष्णा नदीच्या पुलावरून कार कोसळून तिघांचा मृत्यू

Spread the love  सांगली / संजयनगर: कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *