Saturday , July 27 2024
Breaking News

आगामी निवडणुकीसाठी समितीच्या सर्व गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढविणे गरजेचे

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी समितीची स्थापना झाली आहे. या भागातील आपली मराठी अस्मिता दाखवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मराठी माणसाने आजपर्यंत काम केलेले आहे. समितीत अनेक वेळा गटबाजी झाली असली तरी जि. पं. व ता. पं. निवडणूकीत सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आहे. हाआजपर्यंतचा इतिहास आहे. आगामी जिल्हा व तालुका पंचायत निवडणूकीतही समितीच्या सर्व गट-तटानी एकत्र येऊन निवडणूक लढविल्यास समितीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा अभिप्राय म. ए. समितीचे अध्यक्ष व माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी व्यक्त केला.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी शिवस्मारकात झाली. अध्यक्षस्थानी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष व माजी आमदार दिगंबर पाटील होते.
बैठकीच्या सुरुवातीला समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. या बैठकीत समितीचे पदाधिकारी श्रीकांत पाटील व काही कार्यकर्ते दिवंगत झाले त्याबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. तर केंद्र सरकारने पेट्रोलचे दर वाढवल्याबद्दल बैठकीत राज्य व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले की, ज्या वेळेला मी आमदार होतो त्यावेळी म. ए. समितीचे दोन्ही गट व शिवसेनेला एकत्रित करून ता. पं. व जि.पं.च्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी समितीचा गड म. ए. समिती राखण्यात यशस्वी झाले होते. मराठी माणसं अन्य पक्षात व गटात होते तरीही यश मिळाले.
यावेळी व्यासपीठावर चिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर, महादेव घाडी, नारायण लाड, नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाळू शेलार, प्रकाश चव्हाण, विठ्ठल गुरव, जि. पं. सदस्य जयराम देसाई, शंकर पाटील, कुप्पटगीरी, मुरलीधर पाटील, शंकर गावडा, यशवंत बिरजे, विलास बेळगावकर, महादेव घाडी, चिटणीस आबासाहेब दळवी आदीनी विचार मांडले.
आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

जिल्हा पालकमंत्र्यांनी केली खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Spread the love  मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जनतेच्या तक्रारी स्वीकारून समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *