Saturday , July 27 2024
Breaking News

केरळमध्ये लॉकडाऊन; 66 टक्के जनता कोरोनाबाधित

Spread the love

तिरुअनंतपुरम (बेळगाव वार्ता) : मागील 24 तासांत विक्रमी कोरोना रुग्ण आढळल्याने केरळ सरकारने राज्यात पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. राज्यात दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन असेल.
केरळमध्ये मंगळवारी एका दिवसात 22 हजार रुग्ण आढळले. हे देशभरात आढलेल्या एकूण रुग्णांच्या 50 टक्के आहेत. त्यामुळे येथे चिंता वाढली आहे. केरळ सरकारने बकरी ईद रोजी सर्व व्यवहार खुले ठेवण्याची परवानगी दिली होती. त्या निर्णयावर प्रचंड टीकाही झाली होती. गेल्या काही दिवसांपासून घटलेली कोरोना आकडेवारी पुन्हा उचल खात असून मागील 24 तासांत हे आकडे वाढले आहेत. देशभरातील आकडेवारीत केरळमधील 50 टक्के रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरी लाट जाण्याआधीच
महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील अन्य राज्यांमध्ये दुसरी लाट जाण्याआधीच कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. दुसरी लाटेची आकडेवारी प्रचंड वाढून रुग्णसंख्या अलिकडे कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी येऊन एका विशिष्ट आकड्यांवर येऊन थांबली होती. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार दररोजची रुग्णसंख्या 4 लाख रुग्णांवरून 2 लाखांवर आली आहे. यासाठी 26 दिवसांचा कालावधी लागला होता. दोन लाखांची रुग्णसंख्या 1 लाखावर येण्यासाठी 11 तर 1 लाखांवरून 50 हजारांवर यायला 20 दिवस लागले. मात्र, मागील 31 दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची आकडेवारी 30 ते 40 हजारांवर स्थिर आहे. बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार 80 टक्के कोरोना रुग्ण हे केरळ, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यातील आहेत.
ही तर धोक्याची घंटा
केरळमधील 66 टक्के जनतेला कोरोना संक्रमण झाले आहे. भीतीदायक गोष्ट ही आहे की, 50 टक्के लोकसंख्या केवळ केरळमधील आहे. केरळमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्यासाठी कंटेन्मेंट स्ट्रॅटिजीचे उल्लंघन आणि बकरी ईदला दिलेली सवलत या दोन गोष्टी कारणीभूत असल्याचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने पाठविले पथक
मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने केंद्र सरकारने केरळमध्ये पाहणीसाठी पथक पाठविण्याचा निर्णय घेतला. या पथकात 4 सदस्य असतील. कोरोना चाचण्या, उपचार आणि नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत हे पथक पाहणी करेल.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *