Sunday , September 8 2024
Breaking News

श्री महालक्ष्मी कोविड सेंटरमधून रूग्ण सुखरूप

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधून कोरोनाचे रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतत आहेत. त्यामुळे नागरिकातून समाधानाचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील कोरोना रूग्णाची सेवा व्हावी. त्यांना वेळेत उपचार व्हावेत. या उद्देशाने श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरची स्थापना झाली. त्यामुळे तालुक्याच्या विविध खेडोपाडी असलेल्या कोरोना बाधितांना याचा लाभ झाला. खेड्यापाड्याील अनेक रूगणानी सेवा घेतली. बरेचजण बरे झाले.
गुरूवारी दि. १० रोजी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधून दोन कोरोनाचे रूग्ण उपचारानंतर घरी सुखरूप परतले.
यामध्ये खानापूराजवळील हलकर्णी गावचे सुरेश परब हा ३१ मे रोजी दाखल झाला होता तर त्याची आई लक्ष्मी परब या ६ जुन रोजी दाखल झाल्या होत्या. एकाच घरातील दोघेजण दाखल होऊन गुरूवारी ते ठणठणीत होऊन घरी परतले. त्यांना डाॅ. फय्याज यांनी उपाचारानंतर घरी जाण्याचा सल्ला दिला.
यावेळी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूररकर, उपाध्यक्ष पंडित ओगले, सचिव सदानंद पाटील, आनंद पाटील, रवी पाटील, किरण तुडवेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

Spread the love    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *