खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरातील शांतानिकेत स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर्स यांच्या संयुक्त विद्यामाने श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला नंदगड माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी यांनी बुधवारी दि. ९ रोजी भेट दिली.
यावेळी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधील रूग्णांची विचारपूस केली. तसेच श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरसाठी २५ पीपीइ किट दिले.
यावेळी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर, राजू गावडे, रवि पाटील, अशोक नेसरीकर, मनोहर किल्लारी आदी मान्यवर उपस्थित होते.
