खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील खानापूर नगरपंचायतीच्या समुदाय भवनात खानापूर शहरासह तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका तसेच आशा कार्यकर्त्यांना आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते आरोग्य किटसचे वितरण शुक्रवारी दि. १८ रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.अंजली निंबाळकर होत्या. तर कार्यक्रमाला तालूका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रें, बाल कल्याण खात्याचे अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खानापूर शहरातील अंगणवाडी शिक्षिका तसेच आशा कार्यकर्तीस आदिना मास्क, सॅनिटायझर, व इतर साहित्याचे वाटप आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाला खानापूर शहरातील अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्तीस उपस्थित होत्या.
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …