खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्यात गेल्या पाच दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने तालुक्यातील नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत होते.
रविवारी सकाळपासुन खानापूरसह तालुक्यात ऊन पाऊस असा लपंडाव खेळ सुरू होता. त्यामु़ळे रविवारी दुपारपर्यंत पावसाची उघडीप होती. काही वेळ ऊन पडले होते.
खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी गेल्या दोन दिवसापासुन दुथडी भरून वाहत होती. रविवारी सकाळपासुनच उघडीप पडल्याने मलप्रभा नदी पात्रात पाण्याची पातळी काही अंशी कमी झाली होती.
तालुक्यातील नाले, तलावातुन पाणी कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे रविवारी तालुक्यात पावसाच धोका संभवला नाही. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडले होते. त्यातच रविवारी लाॅकडाऊनचा नियम असल्याने सर्रास कोण घराबाहेर पडलेच नाही.
गेल्या २४ तासात तालुक्यात झालेल्या पावसाचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे.
तालुक्यात सर्वात जास्त पाऊस कणकुंबीत १५०.२ मि मी., जांबोटी १२८.६ मि मी., लोंढा पीडब्लीडी ८४.८ मि मी., लोंढा रेल्वे १०५ मि मी, गुंजी ७८ ४ मि मी., असोगा मि मी ७४.२., कक्केरी ४०.०२ मि मी., बिडी ४९ . २ मि मी., नागरगाळी ३४.४ मि मी., खानापूर ६२.मि मी., पाऊस पडला.
