बेळगाव : तीन दिवसांपूर्वी काकती पुलाजवळ मार्कंडेय नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला आहे. काकतीच्या पुलापासून ३ कि.मी. वर असलेल्या दर्गा पुलाजवळ हा मृतदेह सापडला. एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि वाल्मिकी युवा संघटनेच्या कार्यकर्त्यानी सलग तीन दिवस शोधमोहीम राबवली होती अखेर आज या शेतकऱ्याचा मृतदेह हाती लागला.
यावेळी कुटुंबीयांचा शोक अनावर झाला होता. तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांनी सांगितले की, शेताकडे जाताना काकतीजवळील मार्कंडेय नदी पुलाजवळ हातपाय धुण्यास गेलेला काकती गावातील सिद्राई सुतगट्टी हा शेतकरी दोन दिवसांपूर्वी वाहून गेला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह दर्ग्याजवळील दुसऱ्या पुलाजवळ सापडला. आहे.
शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त असतो तेव्हा आणि पुलावर पाणी वाहताना तुम्ही कोणतेही धाडस करायला जाऊ नका.