बेळगाव : कोविड -१९ मुळे मृत्यू झालेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल, असे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले. कोविड -१९ संक्रमणाच्या दुसर्या लाटेत बेळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाने मृत झालेल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या कुटुंबियांना, एम एफ एस डी सी आणि एन सी एफ डी सी मार्फत पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. यापैकी चार लाख हे मुदतीचे कर्ज असून ते ६% व्याजदराने देण्यात येणार आहे. तसेच एक लाख रुपये साह्यधन देण्यात येणार आहे. कोविड -१९ च्या संसर्गाने मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र, कौटुंबिक उत्पन्न दाखला, मृताचे मृत्यू प्रमाणपत्र, कुटुंबाचे रेशन कार्ड, वारसदारांचे आधार कार्ड, आरटीसीपीसीआर रिपोर्ट आदी सर्व आवश्यक कागदपत्रे २२ जून पर्यंत संबंधित पत्त्यावर सादर करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
अनुसूचित जाती जिल्हा व्यवस्थापक, डॉ. बी. आर. आंबेडकर विकास महामंडळ, बेळगाव, सुवर्ण विधान सौध कक्ष क्रमांक१२३, हलगा, बेळगाव ५९००२० या पत्त्यावर सादर करावी.
अनुसूचित जमाती जिल्हा व्यवस्थापक, श्री महर्षि वाल्मीकी विकास महामंडळ, बेळगाव, सुवर्णसुद्धा कक्ष क्रमांक २२, हलगा, बेळगाव येथे कागदपत्रे सादर करावीत.
त्याचप्रमाणे मागासवर्गीय वर्ग जिल्हा व्यवस्थापक, दि. देवराज अर्स विकास महामंडळ, बेळगाव सुवर्णसौध, सुधा तळ मजला, बेळगाव इथे कागदपत्रे सादर करावीत असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.
मृत व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्गातील असावी आणि कुटुंब प्रमुख असावा. वय १८ ते ६० वर्षाच्या दरम्यान असावे व वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांच्या आत असावे. कोविडमुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि मृत्यूचे प्रमाणपत्र दिले पाहिजे असे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.