खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी पार पडलेल्या खानापूर नगरपंचायतीच्या मासीक बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते.
यावेळी तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यानी बैठकीला उपस्थित दर्शविली.
प्रारंभी नगरपंचायतीच्या वतीने आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार केला.
यावेळी बैठकीत नगरपंचायतीच्या दुर्गानगर भागातील वाजपेयी काॅलनीत रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून नगरपंचायतीच्या कर्मचारी वर्गाना प्रलंबीत ठेवला होता. याला कोणतीच अडचण नसताना केवळ दुर्लक्ष करून नागरिकांना या रस्त्यामुळे त्रासात टाकले असा आरोप केला. जर नागरिकांना त्रासात पाडण्याचा प्रयत्न केला. तर मी गप्प बसणार नाही. असा सज्जड इशारा दिला.
यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडून चर्चा केली. तसेच जांबोटी क्राॅसवरील, तहसील कार्यालय समोरील खोकी संदर्भात जोरदार चर्चा करण्यात आली. मलप्रभा नदीच्या चौदामुशीजवळील हिंदू स्मशानभूमीबद्दल व इतर प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
प्रारंभी लेखाधिकारी विवेक बन्ने यांनी स्वागत केले. प्रेमानंद नाईक अहवाल वाचन केले.
बैठकीला स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक नारायण मयेकर, विनायक कलाल, आपया कोडोळी, नारायण ओगले, प्रकाश बैलूरकर, हणमंत पूजारी, विनोद पाटील, महमद रफिक,, नगरसेविका शोभा गावडे, मेघा कुंदरगी, मिनाक्षी बैलुरकर, लता पाटील, जया भुतकी, राजश्री तोपिनकट्टी, सहेरा सनदी, फातिमा बेपारी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
आभार प्रेमानंद नाईक यांनी मानले.