तेऊरवाडी (एस.के. पाटील) : म्हाळेवाडी ता. चंदगड येथे कोविड -१९ पासून गावाला मुक्त करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण मोहिम… आमदार राजेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली.
सध्या सुरु असलेल्या शेतीच्या कामांची धावपळ व लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणारी लोकांची गर्दी पाहता म्हाळेवाडीचे सरपंच सी. ए. पाटील यांनी आपल्या गावातच नागरिकांना लस उपलब्ध करुन दिली. यासाठी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र माणगांव येथील वैद्यकिय अधिकारी यांचेशी संपर्क साधून या लसीकरण मोहिमेअंतर्गत एकूण ६५ लोकांना लसीकरणाचा लाभ मिळवून दिला. हि मोहिम यशस्वी करण्यासाठी माणगाव पी.एच. सी.चे वैद्यकीय अधिकारी डॉ. पठाणे, सुपरवायझर मधाळे, आरोग्यसेविका प्रियांका नौकुडकर, उपसरपंच विजय मर्णहोळकर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रा. पं. कर्मचारी, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शिक्षक, गावातील तरुण वर्ग व ज्येष्ठ ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
Check Also
गडहिंग्लज व नेसरी अंनिसतर्फे सर सेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक परिसराची स्वच्छता!
Spread the love गडहिंग्लज (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर हे महापराक्रमी व प्रतापी …