खानापूर (प्रतिनिधी) : जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील खोकी रस्त्याचे काम पुढे करून एक महिण्यात हटविली. हातावर पोट भरून घेणाऱ्या खोकीधारकाना उपाशी पोटी पाडवले. बघता बघता जांबोटी क्राॅसवर स्मशान शांतता पसरली. जवळपास १०० खोकी भूईसपाट झाली. होत्याचे नव्हते झाले. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी याकडे ढूंकुन ही पाहिले नाही. १०० खोकीधारकांची ५०० मते परत याच लोकप्रतिनिधीना मिळतील का? असा सवाल खोकीधारकातून विचारला जात आहे.
आमची खोकी गेली याची तळमळ तालुक्यातील एकाही नेत्याला लागून राहिली नाही. हे खानापूर तालुक्याचे दुर्दैव आहे. गरीबांचे कैवारी म्हणून घेणारे कोण नेते आहेत. हे आता खोकीधारकाना दिसुन आले.
आता खोकी गेली पुढे कोणता न्याय खोकीधारकाना मिळणार अशी चर्चा खोकीधारकातून चर्चीली जात आहे.
तेव्हा पोटाचा व्यवसाय गेलेल्या खोकीधारकाना न्याय द्यावा. व त्याच्या पोटाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी खोकीधारकासह शहरातील नागरिकांतून होत आहे.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …