खानापूर (प्रतिनिधी) : करजगी (ता. खानापूर) गावात जंगलातुन आलेल्या हरणावर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरूवारी घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अलीकडे जंगली प्राणी अन्नपाण्याच्या शोधार्थ लोकवस्तीपर्यत येत आहेत. असाच प्रकार करजगी (ता. खानापूर) येथे गुरूवारी जंगलातून आलेल्या हरणावर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी मेरडा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवुन हरणाला हलशी पशुवैद्यकीय डाॅक्टराकडून उपचार करून वन खात्याकडे देण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य महाबळेश्वर पाटील, रणजीत पाटील, दीपक पाटील, संजय गिरी नाना पाटील, महाबळेश्वर गुडपीकर, अशोक पाटील, मारूती पाटील तसेच फाॅरेस्टेर, एन. जी. हिरेमठ, गार्ड मंजू नवलकट्टी, नलवडे आदी उपस्थित होते.
यावेळी वनखात्याने हरणाला आपल्या स्वाधीन केले.
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …