Tuesday , July 23 2024
Breaking News

खानापूर-रामनगर रस्त्याच्या कामासाठी वनखात्याची परवानगी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षापासुन वनखात्याने खानापूर-रामनगर रस्त्याच्या कामाला आडकाठी आणली होती. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून खानापूर रामनगर रस्त्याचे काम रखडले. त्यामुळे याभागातील ४० खेड्यातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात भाजपतर्फे खासदार अनंतकुमार हेगडे, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजपनेते शंकरगौडा पाटील वनखात्याकडून एनओसी मिळविली. त्यामुळे खानापूर-रामनगर रस्त्याच्या कामा होनकल गावापासून गुरूवारी सुरूवात झाली, अशी माहिती जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर- रामनगर रस्त्याचे काम व्हावे. यासाठी भाजपच्या मंत्र्यानी प्रयत्न केले. यावेळी १० कोटीचा निधी मंजुर केला. यामध्ये पॅच वर्कसाठी ४ कोटी ९२ लाख रूपये हा करंबळ ते रामनगरपर्यंतच्या रस्त्यासाठी मंजुरी मिळाली आहे. असे असताना तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही रास्तारोको करून भाजपच्यावर आरोप केला.
मात्र खासदार अनंत कुमार हेगडे यांनी या रस्त्याचे पॅच वर्क व्हावे यासाठी ४ कोटी ९२ लाख रूपये मंजुर केले. रामनगर अनमोड रस्त्यासाठी ५ कोटी ८ लाख असे १० कोटीचा निधी मंजुर करून वन खात्याकडून एनओसी मिळविली, अशी पत्रकर परिषदेत दिली.
तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, बाबूराव देसाई आदिंनी याबाबत विचार व्यक्त केले.
खानापूर- रामनगर रस्त्याचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने याभागातील ४० खेड्यातील नागरिकांतुन समाधान पसरले आहे. आता यापुढे तरी खानापूर रामनगर रस्त्यावरून बससेवा सुरूळीत होऊन प्रवाशीवर्गाची तसेच विद्यार्थी वर्गाची सोय होणार आहे.
पत्रकार परिषदेला वसंत देसाई, राजेंद्र रायका, सयाजी पाटील, गुंडू तोपिनकट्टी, मष्णू पाटील, रवि बडगेर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांनी केला खानापूर तालुक्यातील विविध भागांचा पाहणी दौरा

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *