खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायत समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांनी संघटीत राहून ग्राम पंचायत पीडीओ व इतर अधिकाऱ्यांवर अंकूश ठेवण्यासाठी संघटना करणे अत्यंत गरजेचे आहे.
एकाच पिडीओला दोन ग्राम पंचायतीचा कार्यभाग दिला आहे. त्यामुळे सदस्यांनी फोन केला तर दुसऱ्या ग्राम पंचायतीमध्ये आहे. दुसऱ्या ग्राम पंचायतीच्या सदस्याने फोन केला तालुका पंचायतीला आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. विकासकामाबद्दल सदस्याना विश्वासात घेत नाहीत. केवळ गोड बोलुन वेळ काढतात. अशा वेळी ग्राम पंचायत सदस्यांची संघटना असेल तर जाब विचारता येतो. यासाठी ग्राम पंचायत सदस्यांची संघटना करणे गरजेचे आहे. असे मत गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य परशराम चौगुले यांनी खानापूर राम मंदिरात ग्राम पंचायत सदस्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.
यावेळी बैठकीला तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीपैकी जवळपास ३० ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी बैठकीत निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, प्रसाद पाटील, रणजित पाटील प्रविण पाटील, मारूती गुरव, शंकर गावडा, आदीनी विचार व्यक्त केले. यावेळी २०० सदस्य बैठकीला उपस्थित होते.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …