Sunday , September 20 2026
Breaking News

चंदगड तालूक्यात दुसऱ्या पोलिस स्टेशनला मंजूरीसंदर्भात शासन सकारात्मक – गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात दुसरे पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई यांनी दिली.

गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला आमदार राजेश पाटील, पोलीस महासंचालक संजय पांण्डेय, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस जगन्नाथन, वित्त विभागाचे सह सचिव विवेक दहीफळे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई म्हणाले की, चंदगड हा भाग डोंगराळ असून पोलीस ठाण्यात पोहोचण्यासाठीचा वेळ वाचविण्यासाठी तसेच या भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दुसरे पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे दुसरे पोलीस स्टेशन आवश्यक मनुष्यबळासह सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठी विशेष बाबमधून मंजूरी घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री (शहरे) यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले

About Belgaum Varta

Check Also

बाळूमामा देवस्थान घोटाळा प्रकरणाला वेग; आरोपी फरार, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास तीव्र

Spread the love  कोल्हापूर : आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील कथित 60 कोटी 75 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *