खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील तहसील कार्यालयात आपत्ती निवारण बैठकीचे आयोजन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली.
यावेळी येणाऱ्या ९ जूलै ते १५ जुलै पर्यंत जोरदार पाऊस होण्याचा संकेत देण्यात आला आहे. तालुक्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्वधोका टाळण्यासाठी तालुक्यातील खेडोपाडी जुनी कोसळणारी घरे असतील अशा नागरिकांना सावधानतेचा इशारा द्या. तालुक्यातील नद्या नाल्यावरील पूलाच्या मुशीमध्ये लाकडांचे ओढके अथवा जाणारे पाणी आडले असेल तर त्याकडे लक्ष द्या. नदी नाल्याकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा करा. शाळा, समुदाय भवन अपघातकाळी रहाण्यासाठी सज्ज करा, या काळात २४ तास रुग्णांची सोय करण्याचे नियोजन करा. तालुक्यातील दुरध्वनी सेवा सुरळीत ठेवा. आदी सुचना तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय नांद्रे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने, हेस्काॅमच्या कार्यनिवाहक अभियंत्या कल्पना तिरवीर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोटगी, कृषी अधिकारी एस. एस. पोवाडे, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अधिकारी वर्गाने या काळात हलगर्जीपणा करू नये. तालुक्यातील होणाऱ्या आपत्तीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे, अशी सुचना केली.
Check Also
गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश
Spread the love खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …