खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर तीन दिवसाच्या कडक लाॅकडाऊननंतर पुन्हा गजबजले. सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने सरकाराने राज्यात शुक्रवारी ते रविवारी असे तीन दिवस लाॅकडाऊन पार पडले. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून खानापूर शहरात नागरिकांनी
एकच गर्दी केली. जो तो कामानिमित्त दुचाकीसह सोबतीला एक व्यक्ती घेऊन बाजारात हजर यामुळे पुन्हा कोरोनाच्या प्रादुर्भावाला वाव मिळत आहे.
खानापूर शहरातील प्रत्येक दुकानात व्यापारासाठी एकच झुंबड उडाली. सरकारच्या नियमाचे पालन कोणी केले नाही. दुपारी १२ वाजले तरी नागरिकांची गर्दी काही केल्या ओसरली नाही. त्यामुळे पोलिस सुध्दा हतबल झाले. जर नागरिकांनी अशीच गर्दी करून राहिले तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार याचा फटका सर्वानाच बसणार. यासाठी प्रत्येकाने प्रशासनाने नियम पाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन, सॅनिटायझर याचे सक्तीने पालन केले पाहिजे. जर जनतेने याकडे दुर्लक्ष केले तर अनर्थ घडणार याकडे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून विनाकाम फिरणाऱ्या दुचाकी जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. तरच कोरोनावर मात करण्यास मदत होईल अन्यथा कोरोना सर्वांच्या जीवावर बेतेल.
Belgaum Varta Belgaum Varta