येळ्ळूर : येळ्ळूर गावच्या प्रवेशद्वारावर नाल्याच्या बाजूला गावातील हेअर सलून व इतर व्यावसायिकांनी कचरा टाकल्याने गावात प्रवेश करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे तर ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कचऱ्याची उचल करावी, अशी गावकऱ्यांच्यावतीने विनंती करण्यात येत आहे.
कोविडच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलेले असताना येळ्ळूर गावच्या वेशीतील हे घाणीचे साम्राज्य असलेले विदारक दृश्य साथीच्या रोगाना आमंत्रण देणारे आहे. तसेच येथील नागरिकांच्या जिविताला धोका आहे. याविषयी ग्रामपंचायतीला कळवून सुद्धा कोणताही क्रम अद्याप हाती घेतलेला नाही. तरी लवकर कचरा उचलला नाही तर नागरिकांच्यावतीने ग्रामपंचायतीच्या समोर आदोलनन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
Check Also
शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Spread the love बेळगाव : बेळगावातील आणि शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात …