नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे.
नव्या गाईडलाईन्सनुसार, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत किंवा ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही. कोराना रुग्णांना पूर्वी वाफ घ्यायचा सल्ला देण्यात येत होता. मात्र, आता वाफ घ्यायची नाही. तसेच कोणतेही अँटीबायोटीक औषध, व्हिटॅमिनची किंवा झिंकची गोळी घ्यायची नाही. हायड्रॉक्सिक्लोरिक्वीन अथवा डॉक्सीसाइक्लिनचाही वापर करायचा नाही.
यापूर्वी 27 मे रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली होती. त्यामध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, इव्हर्मेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, झिंक आणि मल्टीविटामिन वापरण्यास मनाई होती.
