नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे महागाईचा भडका उडाला आहे. गॅस, कडधान्य, खाद्य तेलाच्या देखील किंमती वाढल्या आहेत. जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर आहे. अशा संकट काळात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल किंमतीत आजही वाढ केली आहे.
तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोलचे दर २४ ते २८ पैसे प्रति लीटर आणि डिझेलचे दर २६ ते २८ पैसे प्रति लीटरने महागले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये १ लीटर पेट्रोलची किंमत ९५.३१ रुपये आणि डिझेल ८६.२२ रुपये झाली आहे.
मे महिन्यांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २१ दिवसांत पेट्रोल ४.९९ पैसे प्रति लीटरने महाग झाले आहे. तर डिझेलची किंमत ५.४४ रुपये प्रति लीटरने वाढली आहे. या वाढत्या महागाईचा सर्वसामान्य जनतेला चांगलाच फटका बसत आहे.
Check Also
तिबेटला भूकंपाचा तडाखा; 53 जणांचा मृत्यू
Spread the love तिबेट : नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका …