खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात सोमवारी दि. ७ रोजी रोप लागवड कार्यक्रम पार पडला.
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते रोप लागवड करण्यात आली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पृथ्वीतलावर वृक्षाचे प्रमाण कमी झाले. कारण वृक्ष तोडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. दुसरीकडे निर्सगाचा ऱ्हास होत आहे. हे कुठ तरी थांबायचे असेल तर प्रत्येकाने झाडे लावणे व ते जगविणे महत्वाचे आहे. यासाठी तालुका पंचायतीच्या अधिकारी वर्गाने वृक्षरोपण करून ती जगवण्यासाठी प्रयत्न करावा. त्या वृक्षाची जोपासना करावी. असे विचार आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले.
प्रारभी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रकाश हलवणावर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला तालुका विस्तार अधिकारी देवराज एम जी, मॅनेजर एस. एस. सपटला, एस. एम. अमनगी, श्री. सातू, व तालुका पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
