खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) गावात कणेरी मठाच्या औषधाचे मोफत वाटप नुकताच करण्यात आले.
शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व व लैला शुगर कारखाना यांच्या सौजन्याने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरच्यामधून श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तोपिनकट्टी गावात कोरोनाच्या महामारीमुळे होणारा सांसर्गिक रोग थांबवावा यासाठी कणेरी मठाचे औषधाचा मोफत पुरवठा करण्यात आला आहे.
याचे वाटप श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, यांच्याहस्ते कणेरी मठाचे औषध मोफत वाटण्यात आले.
यावेळी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष व भाजपचे नेते किरण यळ्ळूरकर, सेक्रेटरी सदानंद पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्ष मारूती गुरव, गावचे नागरिक उपस्थित होते.
