खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरच्यावतीने श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यामाने इदलहोंड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीला श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी भेट देऊन इदलहोंड ग्राम पंचायत हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव संदर्भात चर्चा केली.
यावेळी इदलहोंड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष चांगापा बाचोळकर यांच्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच रुग्ण आढळल्यास श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याविषयी विनंती केली.
यावेळी इदलहोंड ग्रामपंचायतीचे सदस्य रावसाहेब पाटील, यल्लापा होसुरकर आदी उपस्थित होते.
Check Also
टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड
Spread the love खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच …