खानापूर : जंगलाने व्यापलेला खानापूर तालुका हा विस्ताराने सर्वात मोठा तालुका आहे. अशा खानापूर तालुक्याला एकच पोलिस निरीक्षक कार्यरत होते. तीन पोलिस उपनिरीक्षक काम करत होते.
नुकताच कर्नाटक राज्यात पोलिस निरीक्षकाच्या जागा वाढविल्याने खानापूर तालुक्यातील नंदगड पोलिस स्टेशनमध्ये पुन्हा एका पोलिस निरीक्षकाची जागा वाढली. त्यामुळे खानापूर तालुक्याला दोन पोलिस निरीक्षक कार्यरत झाले.
विस्ताराने मोठा असलेल्या खानापूर तालुक्यातील दोन पोलिस स्थानकात मिळून २६२ गावाचा समावेश आहे. यामध्ये खानापूर पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात १६२ गावाचा समावेश आहे. तर नंदगड पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात १०१ गावाचा समावेश आहे.
खानापूर तालुका हा विस्ताराने मोठा तसेच जंगलाने वेढलेला तालुका आहे. त्यामुळे मोठ्या तालुक्याची सुव्यवस्था व कायदा हाताळताने पोलिस खात्याला तारेवरची कसरत करावी लागत होती.
खानापूर तालुक्यात वारंवार होणाऱ्या आपघातासासारख्या प्रसंगाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. लांबच्या गावात कोणतीही घटना घडल्यास पोलिस अधिकारी वर्गाना जाण्यासाठी उशीर होत होता. याचा विचार करून नंदगड पोलिस स्थानकाला नविन पोलिस निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली.
त्यामुळे आज नंदगड पोलिस स्थानकाला प्रथम पोलिस निरीक्षक म्हणून सत्यापा माळगौडर यांना मान मिळाला. लागलीच त्यानी पदाची सूत्रे स्विकारली आहेत. आता खानापूर पोलिस स्थानकाला एक पोलिस निरीक्षक तर दोन पोलिस उपनिरीक्षक तसेच नंदगड पोलिस स्थानकाला एक पोलिस निरीक्षक तर एक पोलीस उपनिरीक्षक कार्यरत राहणार आहेत. आता खानापूर तालुक्याचा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस खात्याला बरीच मदत होणार आहे.
Check Also
न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य
Spread the love बेळगाव : न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडी हा परिसर सध्या कचऱ्याचा अड्डा बनला …