खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहेत. कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी शववाहिकाची गैर सोय होत आहे. याची जाणीव आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी ठेवुन दोन शववाहिकाची उपलब्धता करण्यात आली. त्याचबरोबर डॉ. अंजलीताई फाऊंडेशनच्या वतीने तहसील कार्यालयाच्या गेटला लागुन २४ तास कोविड मदत केंद्राची सोय करण्यात आली.
या केंद्राचे उदघाटन गुरूवारी दि. ३ रोजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी दोन शववाहिका तसेच कोरोनाग्रस्ताना अंत्यविधीसाठी लागणारे पीपी किट मोफत उपलब्ध करून दिले.
यावेळी नगरपंचतीच्यावतीने एक शववाहिका व आमदाराच्यावतीने एक शववाहिका असे दोन शववाहिका उपलब्ध झाल्या आहेत.
यावेळी तहसीलदार रेश्मा तालिकोटी, तालुका आरोग्यधिकारी डॉ. संजीव नांद्रे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने, नगराध्यक्ष मजहर खानापूरी, ब्लॉक अध्यक्ष कोळी, नगरसेविका , नगरसेवक, तालुका अधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.