खानापूर (प्रतिनिधी) : जत जांबोटी महामार्गावरील पारिश्वाड ते खानापूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे.
मात्र कोरोनाच्या महामारीत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने तसचे लोकप्रतिनिधी कामाची पाहणी न केल्याने संबंधित कंत्राटदारानी या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे केले आहे.
गेल्या कित्येक वर्षानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या महामारीचा फायदा घेत लगबगीने डांबरीकरण संपविण्यात येत आहे. रस्त्याचे म्हणावे तसे खडीकरण करण्यात आले नाही. पाण्याचा वापरही कमी करण्यात आला आहे. शिवाय डांबरीकरणही निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच रस्त्याचे डांबरीकरण उचलून रस्त्यावर पून्हा खड्डे पडणार आहे.
तेव्हा लोकप्रतिनिधीनी रस्त्याच्या डांबरीकरणाची पाहणी करावी. सबंधित कंत्राटदाराला समज द्यावी. अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
