Sunday , September 20 2026
Breaking News

भाजप आयोजित रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान

Spread the love

बेळगाव : सौरभ सावंत (भाजप बेळगाव महानगर जिल्हा स्मित एक्झिट मेंबर) यांच्यावतीने दि. 8 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन भाजप खासदार श्रीमती मंगला अंगडी, भाजप बेळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, दीपा कुडची (डायरेक्टर कर्नाटका स्टेट अर्बन वॉटर सप्लाय अँड ड्रेनेज बोर्ड), बेळगाव बीजेपी महानगर युवा मोर्चा उपाध्यक्ष संजय पाटील, कर्नाटका स्टेट युवा मोर्चा एक्झिक्यूटिव्ह मेंबर श्रेयस नाकाडे, आदर्श नूली यांच्या उपस्थितीत करण्यात आले. खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
समादेवी मंगल कार्यालय सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिरात 25 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
बेळगाव ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबीर पार पाडण्यात आले. ब्लड बँकेचे डॉक्टर व्ही. के तेलसंग, जनसंपर्क अधिकारी विनायक मेणसे आणि आणि सहकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *