बेळगाव : मराठा मंदिर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन कोविड केअर सेंटरला रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आल्या.
रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष अशोक कोळी, सचिव नागेश मोरे, रोटेरियन प्रकाश डोळेकर, संतोष नाईक आदींनी समितीच्या कोविड केअर सेंटरला तांदूळ, तेल, तूरडाळ, साखर, चहा पावडर, साबण आदी साहित्य कोविड केअर सेंटरचे संचालक सदस्य आणि युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके तसेच मदन बामणे, दत्ता जाधव, सागर पाटील यांच्या उपस्थितीत केंद्राकडे सुपूर्द केल्या. यावेळी अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
