Monday , July 22 2024
Breaking News

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करा; मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

Spread the love

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नुकतीच बैठक पार पडली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली.  यावेळी पंतप्रधान मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असं आश्वासन त्यांनी दिले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही यावेळी उपस्थित होते. जे विषय मांडले आहेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान सोडवतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षण, मागावसर्गीयाचं बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागेची उपलब्धतता. जीएसटी परतावा, पीक विमाबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचे  उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. “आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही,” अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असे  मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.
तुमच्याकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती मोदींना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मराठा असो किंवा ओबीसी आरक्षण असो घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील सकारात्मक भूमिका घ्यावी असे सांगितले  असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

विशाळगडावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

Spread the love  मुंबई: विशाळगडावर झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात तणाव निर्माण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *