खानापूर : कर्नाटक राज्याचे माजी मंत्री श्री. आर. व्ही. देशपांडे व त्यांचे चिरंजीव श्री. प्रशांत देशपांडे यांची खानापूर तालुक्याला नुकताच भेट झाली.
यावेळी तहसील कार्यालयाला भेट देऊन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्याकडे मास्क, सॅनिटाइझर व व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा साठा सुपूर्द केला व गरजु लोकांपर्यंत पोहचवण्याची सुचना केली,
यावेळी बोलताना माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे म्हणाले की कोरोना सारख्या महामारीमुळे जीवन असह्य झाले आहे. कोरोना मुक्त व्हायचे असेलतर प्रत्येकाने मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य सोशल डिस्टन ठेवणे, सॅनिटाइझरचा वापर करणे फारच महत्वाचे आहे. असे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार रेश्मा तालिकोटी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने, नगराध्यक्ष श्री. मझहर खानापूरी, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. महादेव कोळी कॉंग्रेस मायनोरीटी अध्यक्ष गुडूसाब टेकडी, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. श्रीमती अनिता दंडगल, सुरेश दंडगल, सुरेश जाधव, इसाखान पठाण आदी काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
