खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे लाॅकडाऊन कडक करण्यात आला. मात्र जत- जांबोटी महामार्गावरील रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने खानापूर शहराच्या जांबोटी फाट्यावरील अनेक खोकी हटल्याने आता खानापूरचा जांबोटी क्राॅसवर सुना सुना वाटत आहे.
सध्या कोरोनामुळे कोणच बाहेर पडत नाही. मात्र खोकी हटवण्याची सक्ती करण्यात आल्याने रविवारी सोमवारी दोन दिवस खोकीधारकानी आपली खोकी हटवली. त्यामुळे आता जांबोटी क्राॅसवरील रस्ता सुना सुना झाला आहे.
आता खोकीधारकानी आपली खोकी हटवली. मात्र यापुढे खोकीधारकाना व्यवसाय नसल्याने त्याचा उदरनिर्वाह कसा चालणार. तेव्हा लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन खोकीधारकाना न्याय द्यावा, अशी मागणी खोकीधारकातुन होत आहे.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …